जि.प.सदस्य नंदकिशोर महाजनांची मागणी योग्यच : रीपाइं-भाजपातर्फे निवेदने


रावेर : जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन यांची ई-टेंडर व कामांच्या केलेल्या चौकशीची मागणी योग्यच आहे. याला सामाजिक रंग देऊ नका उलट या सर्व प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी व्हावी यासाठी मंगळवारी भाजपा व रीपाइंतर्फे जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्या मागणी समर्थनार्थ निवेदन देण्यात आले.

कामांच्या चौकशीचा मुद्दा योग्यच
दलित वस्तीच्या कामांच्या चौकशी व ई-टेंडरचा मुद्दा योग्य असल्याने मंगळवारी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय जनता पार्टीतर्फे तहसील कार्यालय व पंचायत समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आले. चौकशीच्या प्रकरणाला सामाजिक रंग देऊ नका या सर्व प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी सुरु असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




रीपाइंतर्फे यांनी दिले निवेदन
रीपाइंतर्फे देण्यात आलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष विक्की तायडे, तालुका सचिव कमलाकर गाढे, सहसचिव भीमराव तायडे, सतीष निकम, ईकबाल शेख, राजेंद्र वाघ, सुरज मोरे, हिरालाल मोरे, शेख रफीक, हिरालाल सोनवणे आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

भाजपातर्फे यांनी दिले निवेदन
भाजपातर्फे देण्यात आलेल्या निवेदनावर भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पंचायत समिती सभापती कविता कोळी, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, श्रीकांत महाजन, संदीप सावळे, हरलाल कोळी, अरुण शिंदे, युवराज चौधरी आदी भाजपा पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !