दीपनगरचे नूतन मुख्य अभियंता विजय राठोड यांचे स्वागत


भुसावळ : औष्णिक विद्युत केंद्रात नव्याने रुजू झालेले मुख्य अभियंता विजय राठोड यांचे मंगळवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले. संघटनेच्या प्रलंबित प्रश्नांवर त्याचप्रमाणे येणार्‍या अडीअडचणी संदर्भात चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष मिलिंद खंडारे यांनी यावेळी केले. संघटनेचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे व सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही राठोड यांनी दिली. यावेळी संघटनेच्यावतीने अध्यक्ष मिलिंद खंडारे, सचिव अख्तर तडवी, कार्याध्यक्ष रोशन वाघ, प्रमुख सल्लागार एम.एम.पागवाड , सहसचिव नितीन सोनवणे, उपाध्यक्ष छगन पवार, खजिनदार सतीश ढवळे, सभासद संतोष पंतोजी, राज माने, संतोष वानखेडे व प्रसिद्धी प्रमुख मनोज जमदाडे सहित पदाधिकारी व सभासद बंधू उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !