राज्यातील शिक्षकांची रीक्त पदे भरा


शिक्षक परीषदेचे शिक्षण मंत्र्यांना निवेदन

शिंदी : राज्यात सुमारे 40 हजार शिक्षकांची रीक्त पदे असल्याने सुमारे आठ ते दहा लाख विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहत असल्याने ही पदे त्वरीत भरण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण विभागाच्या अपर सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त द. गो. जगताप यांना दिल्याची माहिती जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक परीषदेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष गिरीष एस.नेमाडे यांनी दिली.

शिक्षण विभागाने दखल घेण्याची अपेक्षा
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची घटनात्मक जबाबदारी शासनावर आहे. ही घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक संख्येत शिक्षकांची पदे भरणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येणार नाही. सद्यस्थितीत राज्य जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील जवळपास 13 हजार अशी सुमारे 40 हजार पेक्षा अधिक शिक्षकांची पदे रीक्त आहेत त्यामुळे जवळपास आठ ते दहा लाख विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली असल्याचे गिरीश एस.नेमाडे यांनी सांगितले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !