भुसावळात दूषित पाण्याबाबत विरोधक आक्रमक : अभियंत्यास घेराव


भुसावळ : शहरवासीयांना होणारा पाणीपुरवठा गढूळ व दूषित असल्याने शहरात साथीचे आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या विरोधी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांना घेराव घालत जाब विचारला. शहराचा पाणीपुरवठा आधीच विस्कळीत असून त्यातच जे पाणी शहरवासीयांना मिळत आहे ते देखील दूषित व गढूळ असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगितले. पावसाची समस्या आत्ताच निर्माण झाली असलीतरी पाणीपुरवठ्याची समस्या यापूर्वीच असल्याचे नगरसेवकांनी यावेळी सांगितले. प्रसंगी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी फिल्टर हाऊसची पाहणी केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी कृउबा सभापती सचिन चौधरी, विरोधी गटनेते दुर्गेश ठाकूर, उल्हास पगारे, शे. शाकीर, सलीम पिंजारी, प्रदीप देशमुख, सचिन पाटील साजीद शे. आदी उपस्थित होते.




तर शहरवासीयांना हवाच पुरवणार का ? : सचिन चौधरी
विरोधी गटातील सदस्यांनी फिल्टर हाऊसची पाहणी केल्यानंतर पाण्याचे नमुने घेत पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख व पदाधिकारी यांना घेराव घातला. गटनेता दुर्गेश ठाकूर व सचिन चौधरी यांनी प्रलंबित असलेल्या अमृत योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. अमृतच्या फिल्टर प्लँटचे नियोजन नाही. तापी नदीतील अमृतच्या बंधार्‍याबाबतचा अहवाल नाही आदी मुद्दे मांडत शहरात अंथरलेल्या पाईप लाईनमधून फक्त हवाच पुरवणार का? असा सवाल करीत जीर्ण झालेल्या फिल्टर प्लँटऐवजी नवीन फिल्टर प्लँटच्या प्रस्तावाकडे सत्ताधार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सचिन चौधरी यांनी यावेळी केला. पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख यांनी जलशुद्धीकरणासाठी राबवल्या जाणार्‍या प्रयत्नांची माहिती दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !