मेहूण तापीतीरी वारकरी संप्रदायातील प्रमुख फडकरी


भुसावळ : श्री संत आदिशक्ती मुक्ताई संस्थान, मेहूण तापीतीर (ता. मुक्ताईनगर) येथे श्री संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी वारकरी संप्रदायातील प्रमुख फडकरी महाराज मंडळी आले आहेत. श्री क्षेत्र मेहूण येथे श्री संत मुक्ताई मूर्ती प्राणप्रतिष्ठे करीता भास्कर महाराज, फडप्रमुख श्री आप्पासाहेब महाराज वास्कर, केशवबापू कबीर, श्री बाबा महाराज देहूकर (तुकाराम महाराजांचे वंशज), किसनगिरी बाबा देवगड, श्रीराम महाराज मेहुणकर ही सर्व मंडळी उपस्थित होती. त्यातील अप्पासाहेब महाराज वास्कर यांचे नातू देवव्रत उर्फ राणा महाराज वास्कर (भास्कर महाराज फड प्रमुख), बाबा महाराज देहूकर यांचे नातू चैतन्य महाराज देहुकर (तुकाराम महाराज यांचे वंशज, देहूकर महाराज फड प्रमुख), वारकरी संप्रदाय पाईक संघ अध्यक्ष विठ्ठल महाराज चवरे, भागवत महाराज हांडे, नागेश महाराज बागडे, भरत महाराज अलिबागकर ही सर्व मंडळी आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा सांभाळत संत मुक्ताईच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर (अंतर्धान स्थळ, ता.मुक्ताईनगर) येथे आली. संस्थानच्या वतीने संस्थानचे विद्यमान अध्यक्ष रामराव महाराज मेहुणकर यांच्या हस्ते या सर्व महाराज मंडळींचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित शारंगधर महाराज मेहूणकर (विश्वस्त), तुकाराम महाराज मेहूणकर, दत्तात्रय किसन पाटील (सचिव), भानुदास महाराज मेहूणकर उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !