भुसावळात पर्यावरण संवर्धनासाठी शिवसेनेतर्फे वृक्षारोपण
भुसावळ : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शिवसेनेतर्फे वृक्षारोपण करून ट्री गार्ड लावण्यात आले. कोरोना काळात निधन झालेल्या स्व.सुशीलाबाई खरारे, स्व.संजीव कोलते, स्व.केशव महाजन, अॅड.मतीन अहमद, स्व.अॅड.अशोक शिरसाट, स्व.हंसराज मगर, पत्रकार स्व.विजय घोरपडे, पत्रकार स्व.परशुराम धोंडे, हवालदार आनंदा गजरे, कॉन्स्टेबल एजाज पठाण यांच्या नावाचे ट्री गार्ड लावून वृक्षारोपण करण्यात आले तसेच पालकत्व व संगोपन करण्याची जबाबदारी कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांनी घेतली. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड.जगदीश जी.कापडे, शिवसेना शहर प्रमुख निलेश महाजन, नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपशहर प्रमुख राकेश खरारे, जाकीर पेंटर, नाना मोरे, अरुण साळुंखे, मधुकरराव हिंगणे, धीरज वाढोणकर, प्रमोद पाटील, समीर तडवी, विवेक राजपूत, शिवाजी दावभट, महेश पवार, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.




