साईनगर शिर्डी-हावडा विशेष आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-सीयालदह विशेष गाड्यांना मुदतवाढ
भुसावळ : साईनगर शिर्डी-हावडा विशेष आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-सीयालदह विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 02593 साईनगर शिर्डी-हावडा विशेष अतिजलद गाडी 7 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबरदरम्यान चालविण्यात येईल. 02594 हावडा-साईनगर शिर्डी विशेष अतिजलद गाडी 5 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत चालविण्यात येईल. 02594/02593 विशेष गाडीच्या विस्तारीत फेर्या विद्यमान संरचना, वेळ आणि थांब्यांनुसार चालविण्यात येतील. 03180 लोकमान्य टिळक टर्मिनस-सीयालदह विशेष गाडी 10 ऑगस्ट ते 28 सप्टेंबरपर्यंत चालविण्यात येईल. 03179 सियालदह-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 8 ऑगस्ट ते 26 सप्टेंबरपर्यंत चालविण्यात येईल. 03180 ही गाडी दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 4.40 वाजता सुटेल आणि सीयालदह येथे तिसर्या दिवशी सकाळी 9.00 वाजता पोहोचेल.
03179 प्रत्येक रविवारी 6.30 वाजता सियालदह येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्या दिवशी 07.25 वाजता पोहोचेल. बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्वच निकष, एसओपी यांचे पालन करावे लागेल. विशेष अतिजलद ट्रेनमध्ये बसण्यासाठी कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच परवानगी देण्यात येणार आहे.




