रात्री झोपेसाठी घ्याव्या लागतात गोळ्या : गटशिक्षणाधिकारी
रावेर : शाळांच्या तपासण्या, कोरोनाच्या नियमावली इत्यादी कामांचा इतका ताण वाढलाय की रात्री झोप घेण्यासाठी गोळ्या घ्यावा लागतात, अशी भावना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शैलेंद्र दखणे यांनी व्यक्त केली. दखल म्हणाले की, आमच्याकडे असलेली रीक्त पदे सततच्या बैठका आणि कोरोना नियमांची शाळेत अंमलबजावणी यासर्व गोष्टीकडे लक्ष ठेवून प्रचंड कामाचा ताण आला आहे.
रीक्त पदांची डोकेदुखी
एक गटशिक्षणधिकारी, सहा विस्तार अधिकार्यांपैकी पाच जागा रीक्त आहेत. 14 केंद्र प्रमुखांपैकी 12 जागा रीक्त आहे. त्यात रावेर तालुक्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या 46 गावातील शाळा सुरू झाल्याने 50 टक्केच्या आता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून शिक्षण दिले जात आहे. शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात रीक्त पदे असतांना जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील रावेर तालुक्यातील आहे. त्यांनी लक्ष देवून रीक्त पदे तत्काळ भरण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



