शिवपूर कन्हाळ्यात गावठी हातभट्टी उद्ध्वस्त : 32 हजारांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ : तालुका पोलीस ठाणे हद्दीतील शिवपूर कन्हाळा गावात संशयीत उस्मान हसन गवळी (45, रा.शिवपूर कन्हाळा) हा गावठी दारूची भट्टी चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी कारवाई करीत गूळ, मोह नवसागर मिश्रीत दारू गाळण्याचे पाच ड्रम कच्चे रसायन व तयार दारू मिळून 32 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार युनूस इब्राहिम शेख, विठ्ठल फुसे, रीयाज काझी, संदीप बडगे, गणेश राठोड शिवाजी खंडारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.




