सोशल मिडीयावरील ओळख पडली महागात : तारांकीत हॉटेलमध्ये तरुणीवर बलात्कार


मुंबई : सोशल मिडीयावरून निर्माण झालेल्या ओळखीनंतर वाढदिवसाच्या निमित्ताने तरुणाने तरुणीला पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीच्या आरोपानुसार, आरोपीने तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावत वरळीतील एका हॉटेलमध्ये नेले व पेयातून गुंगीचे औषध दिल्याने तरुणी बेशुद्ध झाली. यानंतर तरुणीवर अत्याचार करण्यात आला व शुद्धीवर आल्यानंतर ती रूममध्ये एकटीच होती. वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा वरळीत घडल्यामुळे पुढील तपासासाठी तो वरळी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !