वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या जळगांव झोन अध्यक्षपदी शेख शब्बीर
दीपनगर : वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची नुकतीच दीपनगर येथे प्रदेश कार्यकारणी बैठक झाली. अध्यक्षस्थानी माजी मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर होते. या बैठकीत महावितरण कंपनी मर्यादीत जळगांव झोनच्या अध्यक्षपदी शेख शब्बीर ईस्माईल यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कंत्राटदाराला न्याय मिळवून देणार : शेख शब्बीर
शेख शब्बीर म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात वंचित बहुजन संघटनेतर्फे प्रत्येक वंचित कंत्राटदाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल शिवाय जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी प्रसंगी दिली. केंद्रीय पदाधिकारी उपाध्यक्ष मन्साराम कोळी, सचिव प्रकाश तायडे, सहसचिव नारायण झटके, कोषाध्यक्ष संतोष तेलंग, संघटक उस्मानखान पठाण, तौसीफखान पठाण उपस्थित होते. दीपनगर शाखाध्यक्ष राजगोपाल तेलंग, सचिव रामचंद्र तायडे, सुरेश टाक, संजय अडकमोल, शकील खान, नितीन हिवाळे, रवींद्र सरदार, संजय रावलकर, संदीप पाटील, सुरेंद्रसिंग ठाकुर, दीपरत्न तायडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन संघटनेचे सल्लागार आर.आर.आव्हाड यांनी करून आभारही मानले.



