भुसावळात रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचेे पदग्रहण उत्साहात


जगातून पोलिओ निर्मूलन करण्यामधे रोटरीचे मोठे योगदान : डॉ.आनंद झुनझुनवाला

भुसावळ : रोटरी क्लब ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे. जगातून पोलिओ निर्मूलन करण्यामधे रोटरीचे मोठे योगदान आहे. रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्य नव्हे तर वैयक्तिक विकासासोबतच मैत्री जपण्याचे कार्य केले जात असते. रोटरी सदस्यांच्या वर्गणीमधून हे कार्य सुरू असते. रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच आपण दान करत असतो. याकरता रोटरीमध्ये जास्तीत जास्त सदस्य सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जगामध्ये कुठेही जिथे गरज असते तेथे रोटरी पोहोचत असल्याचे प्रतिपादन डॉ.आनंद झुनझुनवाला यांनी केले.

भुसावळात पदग्रहण समारंभाचे आयोजन
रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे पदग्रहण समारंभाचे आयोजन बालाजी लॉनमध्ये करण्यात आले. यावेळी आमदार संजय सावकारे, माजी प्रांतपाल राजेश मोर, अध्यक्ष डॉ.संजू भटकर, सचिव जीवन महाजन, माजी अध्यक्ष सुधाकर सनंसे, माजी सचिव राम पंजाबी, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, इनरव्हील क्लबचे डॉ.रश्मी शर्मा, रोटरॅक्ट डीडीआर लोकेश कांसल, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचे अध्यक्ष हरविंदरसिंग थेटी, सचिव आशीष अग्रवाल, माजी अध्यक्ष संदीप जोशी, इनरव्हील क्लब रेलसिटीचे अध्यक्ष वंदीता पारे आदी उपस्थित होते. माजी प्रांतपाल राजेश मोर यांनी प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या संदेशाचे वाचन केले.




डायलिसिस सेंटर सुरू करणार
कोरोना काळात रूग्णांवर वेळेवर उपचार व्हावे यासाठी ट्रामा सेंटरमध्ये रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली व रोटरी क्लब ऑफ भुसावल रेल सिटी या दोघांनी ऑक्सिजन प्रणाली बसवल्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले. त्याच पद्धतीने आता शासनाच्या व रोटरी क्लबच्या मदतीने भुसावळात डायलिसिस सेंटर सुरू करण्यावर ती भर आहे व हे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले.

बोर्ड ऑफ डायरेक्टर असे
अध्यक्ष डॉ.संजू भटकर, माजी अध्यक्ष सुधाकर सनंसे, भावी अध्यक्ष नुतन फालक, सचिव जीवन महाजन, खजिनदार सुनील वानखेडे, टीआरएफ चेअर डॉ.रश्मी शर्मा, मेंम्बरशिप चेअर डॉ.सुधिर शर्मा, पब्लीक इमेज चेअर योगेश इंगळे, सर्व्हीस प्रोजेक्ट चेअर समाधान जाधव, युथ सर्व्हीस चेअर किशोर पाचपांडे, जॉईंट सेक्रेटरी प्रदिप सोनवणे, सार्जट अ‍ॅटआरम्स मुकेश अग्रवाल आदी. सूत्रसंचलन सुनील वानखेडे तर आभार नुतन फालक यांनी मानले. यशस्वीतेसाठी धर्मेद्र मेंडकी, डॉ.सुधीर शर्मा, सुनील शिरनामे, डॉ.वंदना वाघचौरे, आदील खान आदींनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !