शेती उद्योगात नावीण्यपूर्ण प्रयोगशीलता विकसीत करा : आमदार शिरीष चौधरी


फैजपूर : शेती उत्पादनात केलेले नवनवीन प्रयोग यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र तसेच स्व.पंकज महाजन प्रतिष्ठान सतत प्रयत्नशील आहे व यापुढेही राहू, असे आमदार शिरीष चौधरी यांनी ‘स्वर्गीय पंकज महाजन कृषी साधना पुरस्कार’ प्रसंगी सांगत शेतकर्‍यांच्या नेहमी पाठीशी उभे राहण्याची ग्वाही शेती उद्योगात नावीण्यपूर्ण प्रयोगशीलता विकसित करण्याचे आव्हान त्यांनी केले. धनाजी नाना महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी या पाचव्या पुरस्कार वितरण समारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी शेतीमध्ये नाविण्यपूर्ण कार्य करणार्‍या शेतकर्‍यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद येथील फळबाग तज्ञ व गट शेती प्रवर्तक डॉ.भगवानराव कापसे, नागपूर येथील बांबू मिशनचे समन्वयक आर.डी.पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी स्व.पंकज महाजन यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पर्यायी पिके घेत विकास साधला व शेतकरी बांधवांना प्रोत्साहित केले म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या पुरस्काराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी डॉ.भगवानराव कापसे व आर.डी.पाटील यांनीही उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र पालचे महेश महाजन यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मधुकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भागवत पाटील, धनंजय चौधरी, रमेश पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, संजय महाजन, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे, लिलाधर चौधरी, अजित पाटील, बापू पाटील, विलास तायडे, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, प्राचार्य आर.एल.चौधरी, प्रभात चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, रमेश महाजन, पंचायत समिती सदस्य सुरेखा पाटील, कृषी महामंडळ पुणे येथील कृषी दूत तेजस सुधाकर झोपे, निरंजन पाटील, निरंजन बोरसे, किरण सतारले, राज गुंडगुंळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन पंकज महाजन मित्र परीवार व कृषी विज्ञान केंद्र, पाल यांच्यातर्फे करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !