रोटरी क्लब भुसावळ रॉयल्सचा पदग्रहण सोहळा उत्साहात


भुसावळ : शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ रविवार, 1 ऑगस्ट रोजी रोटरी भवनात झाला. माजी अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी नूतन अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांना तर अ‍ॅड.विनोद तायडे यांनिी सचिव पदाचि सूत्रे हाती घेतली. भुसावळ ऑर्डनन्सचे मुख्य प्रबंधक वसंत निमजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरीच्या निस्वार्थी सेवा कार्याचा त्यांनी याप्रसंगी गैारव केला. रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल विष्णू भंगाळे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रांतपाल रमेश मेहेर यांनी पाठवलेल्या संदेशाचे त्यांनी वाचन केले. शहरातील 21 मान्यवरांनी प्रसंगी क्लबमध्ये प्रवेश केला. शेतकरी हिताचे व आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे कार्यक्रम राबवण्याचा विचार नूतन अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांनी व्यक्त केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !