रावेरात महिलेने दिला तिळ्या बाळांना जन्म
रावेर : शहरातील रहिवासी अमरीन बी.शेख मुस्तकीन (22) या विवाहितेने शहरातील माऊली हॉस्पीटलमध्ये तिळ्या बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे महिलेचे नॉर्मल प्रसुती करण्यात आली असून तिघा मुलांसह मातेची प्रकृती उत्ताम आहे. शहरातील मन्यारवाडा भागातील रहिवासी अमरीन बी.शेख मुस्तकीन या महिलेस प्रसुतीसाठी माऊली हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ.संदीप पाटील यांनी संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकांना धीर देत अमरीनची नॉर्मल प्रसूती केली. सोमवारी दुपारी 1.22 वाजेच्या सुमारास महिलेने तिळ्यांना जन्म दिला. तिघेही मुले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. तिळ्यांना जन्म दिल्याचे माहित होताच रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली.




