लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंना अभिवादन
थोर पुरूषांच्या पुण्यतिथी व जयंतीनिमित्त भुसावळ शहर व विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन
भुसावळ : भुसावळ शहर व परीसरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्त सोशल डिस्टन्सचे पालन करीत मान्यवरांनी थोर पुरूषांच्या कार्याला उजाळा दिला. विविध संस्था, सामाजिक संघटनांतर्फेही थोर पुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी
भुसावळ : शहरातील नसरवांजी फाईल भागातील राजीव गांधी वाचनालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. माजी आमदार नीळकंठ फालक, जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, जिल्हा उपाध्यक्ष के.बी.कोटेचा, राजेंद्र पटेल, आर.जी.चौधरी, डॉ.नईम मझहर, डॉ.सुवर्णा गाढेकर, जगपालसिंग गील, सलीम गवळी, शेख हमीद, अकील शाह, विनोद शर्मा, संदीप देवडा, गोविंदा पाटील, विनोद शर्मा, सचिन डेलिवाला, जॉनी गवळी, सायरा बानो, यास्मीन बानो, हमीदा गवळी, शीला परदेशी, प्रदीप नेहेते, कैलास चौधरी आदींची उपस्थिती होती.



पु.ओ.नाहाटा महाविद्यालय
भुसावळ ः ताप्ती एज्युकेशन संचलित भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ. ए.डी.गोस्वामी होते. प्रास्ताविक एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एस.नाडेकर यांनी केले. प्रा.डॉ.विलास महिरे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्व स्पष्ट केले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक जयश्री पाटील यांनी मानले. डॉ.ममताबेन पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रथम व द्वितीय वर्षाचे स्वयंसेवक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ. बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे व उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.
अण्णाभाऊ साठे नगर, भुसावळ
भुसावळ : अण्णाभाऊ साठे नगरात भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, भुसावळ भाजप शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, राजु खरारे, भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे, ऑल इंडिया एस.सी.एस.टी ऑपरेटिंग ब्रांच अध्यक्ष रेल्वे ईसीसी बँक डिलिगेट वाल्मिक देहाडे व शहर उपाध्यक्ष रवींद्र दाभाडे, शहर उपाध्यक्ष संतोष ठोकळ, वॉर्ड अध्यक्ष अजय लोखंडे, मुकेश कांबळे यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी अण्णाभाऊ साठे नगर मित्र परीवार व भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल तायडे व उपाध्यक्ष संतोष ठोकळ यांनी सहकार्य केले.
मुक्ताईनगरात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
मुक्ताईनगर : जुने गावातील नागेश्वर मंदिरातील सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. तालुकाप्रमुख छोटू भोई, जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड.मनोहर खैरनार, नारायण जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शकुर जमदार, गोपाळ सोनवणे, नगरसेवक पियुष मोरे, मुकेशचंद्र वानखेडे, संतोष मराठे, डॉ.आर.एन.शेवाळे, एस.एस.गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. दीपक खुळे, विशाल खुळे, अजय खुळे, शांताराम अवसरमोल, पुंडलिक जाधव, महेश खुळे, राजू सोनवणे, संदीप गायकवाड, चंद्रकांत साळवे, योगेश जाधव आदींसह समाज बांधवांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर
अंतुर्ली : इंदिरा नगर भागात शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मातंग समाजातर्फे साजरी करण्यात आली. प्रास्ताविक दिगंबर सावकारे यांनी केले. ज्येष्ठ समाजसेवक एस.ए.भोई, पोलीस पाटील किशोर मेढे, सरपंच पती सुपडू शिर तुरे, ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार, ग्रामपंचायत सदस्य जहीर शेख, शेख भैय्या करीम, अशोक सपकाळ, नामदेव भोई, अनिल वाडीले, काशीनाथ बुवा, पंकज पाटील, शाकीर शेख तसेच मातंग समाजातील चंद्रकांत तायडे, भास्कर शेलार, लखन शेलार, सुमनबाई उबाळे, मंगलाबाई शेलार, कल्पेश उबाळे, ज्ञानेश्वर उबाळे, भगवान शेलार, यमुनाबाई शेलार, इंदुबाई उबाळे, अनुसयाबाई उबाळे, आकाश उबाळे, गणेश उबाळे, निलेश उबाळे, सुरेश शेलार, उषाबाई शेलार आदींची उपस्थिती होती. समाजसेवक भोई व ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार यांनी मार्गदर्शन केले. आभार चंद्रकांत तायडे यांनी मानले.
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय
अंतुर्ली : ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमास सरपंच सुलभा शिरतुरे, पोलीस पाटील किशोर मेढे, वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए.भोई, भाऊराव महाजन यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी राजेंद्र शिरतुरे, माजी मुख्याध्यापक बी.एस.वानखेड, अशोक सपकाळ, जगन्नाथ पाटील, शेख शाकीर, पंकज पाटील, विठ्ठल महाजन, नामदेव भोई, शेख भैय्या शेख करीम, चंद्रकांत केशव तायडे, कल्पेश राजू उबाळे, आकाश ज्ञानेश्वर उबाळे, दीपक रामदास शेलार, ईश्वर भास्कर शेलार, सुखदेव पाटील, हितेश पाटील, जितेंद्र मेढे, काशीनाथ महाजन व समाजबांधव उपस्थित होते. हितेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुखदेव पाटील (धुरखेडे) यांनी वाचनालयास अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट दिली. आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक अनिल वाडीले यांनी मानले. ग्रंथपाल मधुकर वानखेडे, लिपिक अनिल न्हावकर, शांताराम महाजन भानुदास टेलर यांनी सहकार्य केले.

