वंचित आघाडीतर्फे 7 रोजी परीषद सर्कल व बूथ बांधणी संपर्क अभियान
रावेर : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात वंचित संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य महिला व युवा आघाडी समिती सदस्य शमिभा पाटील, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, अॅड.विनोद इंगळ, महेंद्र सुरडकर, रफीक बेग आदींच्या प्रमुख उपस्थिती शनिवार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारीणीतर्फे जिल्हा परीषद सर्कल व बुथ बांधणी संपर्क अभियान आयोजीत करण्यात आले आहे.
पदाधिकार्यांना उपस्थितीचे आवाहन
या अभियानात रावेर तालुक्यातील संपुर्ण तालुका कार्यकारणी, रावेर शहर कार्यकारणी, सावदा शहर कार्यकारणी, तालुका महिला कार्यकारीणी व ग्रामशाखा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी रावेर तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, विनोद तायडे, सलीम शाह, अर्जुन वाघ, राजेंद्र अवसरमल, जलीलखान, नितीन अवसरमल, बाळा शिरतुरे, रावेर शहराध्यक्ष अब्बासभाई, उपाध्यक्ष मोहम्मद शाह, दौलत अढांगळे, बबलु भाई, सलमान भाई, शेख इमरान, महिला आघाडी निता कोचुरे, जलील शेख, रवींद्र तायडे, प्रभाकर तायडे, संघरत्न शीरतुरे यांनी केले आहे.



