भुसावळात 9 रोजी श्री नगरमध्ये ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत आरोग्य शिबिर
भुसावळ : शहरातील जळगाव रोड विभागात क्रांती दिनानिमित्त सोमवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी जवळ ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट ट्रामा आणि डायलिसिस सेंटर नवकार अॅक्सीडेंट हॉस्पिटल व नेत्रम हॉस्पिटल येथील नामांकित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, ब्लडप्रेशर, ऑक्सिजन लेव्हल, इसीजी तपासणी, मधुमेह तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, नेत्र तपासणी सोबतच आरोग्यदायी योजनेंची माहिती दिली जाणार आहे. परीसरातील सर्व ज्येष्ठ नागरीकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक दीपक धांडे (9371277236) यांनी केले आहे.




