इनरव्हिल क्लब ऑफ भुसावळ ब्लोसमचा पदग्रहण सोहळा उत्साहात
भुसावळ : इनरव्हिल क्लब ऑफ भुसावळ ब्लोसमचा पदग्रहण रोटरी भवनात उत्साहात झाला. प्रमुख पाहुण्या म्हणून रश्मी शर्मा व शीतल भराडीया होत्या. यावेळी रश्मी शर्मा यांनी क्लबच्या नुतन अध्यक्षा तृप्ती नागोरी यांना पदभार दिला तर शीतल भराडीया यांनी रूचिता अग्रवाल यांना सेक्रेटरी पदाची सुत्रे दिली.
होतकरू महिलांचा सन्मान
यावेळी क्लबतर्फे होतकरू महिलांचा सन्मान करण्यात आला. महिला पोस्टमन रींकू केदारी व अरुणा बाविस्कर, परीचारीका जयश्री मन्ने, कंडक्टर भावना शिंपी अशा चार महिलांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. रश्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पल्लवी झोपे, सिद्दी तिवारी, राखी भराडे, संजीवनी लाहोटी, इशा मनवानी, श्वेता लढ्ढा, वंदीता पारे, नीलिमा निकम, निलिमा धांडे, अम्रीता बजाज यांच्या सह क्लब च्या सदस्या उपस्थित होत्या. आभार रीतीका हेडा यांनी मानले.



