वढोदा ग्रुप ग्रा.पं.वर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा


जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार : विनोद सोनवणे

यावल : यावल तालुक्यातील रीधोरी येथील रीधोरी, करंजी, वढोदा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकिशोर सोनवणे व माजी सदस्य सचिन झाल्टे यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे यांच्या उपस्थितीत व यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला.

फैजपूत कृउबा पदाधिकार्‍यांचा प्रवेश
शनिवार, 7 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. प्रसंगी विनोद सोनवणे म्हणाले की, आगामी जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागले पाहिजे. प्रत्येक गावोगावी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याने जावून
मतदारांना वंचित बहुजन आघाडीची भूमिका पटवून दिली पाहिजे आणि प्रत्येक गावात बूथ बांधणीसाठी एक महिला व चार पुरुष एकूण पाच व्यक्ती तयार करून मतदान पक्षाला जास्तीत-जास्त कसे होईल आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आणता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.




यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला सदस्य शमिभा पाटील, जिल्हा प्रवक्ता अ‍ॅड.विनोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरडकर, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा सचिव दीपक मेघे, जिल्हा प्रमुख सचिन बार्‍हे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, यावल तालुका महासचिव राजेश गवळी, तालुका उपाध्यक्ष भगवान मेघे, तालुका उपाध्यक्ष सागर झाल्टे, अमोल तायडे, शैलेद्र वानखेडे, बाळू तायडे, विद्या तायडे, सरला तायडे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !