हंबर्डीजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक : तिघे तरुण जखमी
यावल : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे तरुण गंभीर जखमी झाले. हा अपघात यावल तालुक्यातील हंबर्डी गावाजवळ सोमवारी झाला. अंकलेश्वर-बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर हंबर्डी गावाजवळ अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकी (एम.एच.19 बी.वाय.4213) ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा चुराडा झाला तर दुचाकीवरील हर्षल मनोज घारू (19, रा.यावल), वासू गैची (रा. यावल) आणि एक अन्य तरूण असे तिघे जखमी झाले. जखमींना जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



