विद्युत दुरुस्ती विधेयकाविरोधात उद्या काम बंद आंदोलन


दीपनगर : वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण प्रस्तावित करणार्‍या विद्युत दुरुस्ती विधेयक 2021 विरोधात मंगळवार, 10 रोजी देशव्यापी काम बंद आंदोलन केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सहभागी त्यात सहभागी होणार असून सर्व पदाधिकारी व सभासद यांनी संपामध्ये सहभागी होण्याचा आवाहन दीपनगर शाखेचे अध्यक्ष मिलिंद खंडारे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे सचिव अत्तर तडवी यांनी हा वीज कायदा फ्रँचाईजी तत्व अवलंबित करणारा असून याच्या विरोधात सर्व कामगारांनी एकजुटीने संप यशस्वी करण्याच आवाहन सर्व कर्मचारी बांधवांना केले आहे. कार्याध्यक्ष रोशन वाघ यांनी खाजगीकरणामुळे भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त व भटक्या जाती इतर मागास वर्गीय व आर्थिक दुर्बल घटक यांचे वीज क्षेत्रातील आरक्षण संपवण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मंगळवारच्या संपामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन संप यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !