सावद्यात विविध मागण्यांसाठी एक दिवसीय कामबंद आंदोलन


सावदा : विविध मागण्यांसाठी सफाई मजदूर काँग्रेस संघटना शाखा, सावदातर्फे सोमवारी एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. लन केले. राज्यात सुरू असलेली सफाईसेवा ठेका पद्धत बंद करावी, वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्वरीत एक लाख कर्मचारी पदे मंजूर करावी, सफाई कर्मचारी यांचे वेतनावर शंभर टक्क्े अनुदान शासनाने मंजूर करावे यासह 21 मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे सावदा शहराध्यक्ष धीरज करोसिया यांच्या अध्यक्षतेखाली काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी शेखर भैरवा, अर्जुन करोसीया, काशिनाथ करोसीया किशोर जी.अटवाल, विनय करोसीया, विलास करोसीया, अजय करोसीया, विनोद पटोणे यांच्यासह सफाई कर्मचारी सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !