डॉ.राजेंद्रजी फडकेंना राज्य सभेची संधी द्या


वरणगाव शहर भाजपा कार्यकर्त्यांनी केली ठरावाद्वारे मागणी

वरणगाव : बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक यांची मोदी सरकारने भारतीय रेल बोर्डावर नियुक्ती केल्याबद्दल वरणगाव येथे भाजपा कार्यकर्त्यांनी बैठकीचे आयोजन करून त्या बैठकीत त्यांचा सत्कार केला. माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, डॉ.राजेंद्र फडके यांनी बालपणापासून पक्ष वाढीचे प्रामाणिक काम केले. उत्तर महाराष्ट्रात पक्ष संघटना काय असते हे त्यांनी दाखवून दिले शिवाय स्व.अशोकबाबा फडके अवघ्या 300 मतांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. पराभूत झाल्यानंतरही फडके परीवार खचून न जाता उभा राहिला. अनेकांना लोकप्रतिनिधी बनवण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतात पक्ष जिथे जवबादारी तिथे जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते घेउन जाने व उमेदवार कोण? याकडे न पाहता ‘कमळ’ हाच उमेदवार मानून त्यांनी प्रामाणिक काम केल्याचे काळे म्हणाले. पक्ष श्रेष्ठींनी आता भाजपातर्फे होऊ घातलेल्या राज्य सभेच्या निवडणुकीत राज्य सभेची डॉ.फडके यांना संधी द्यावी, अशी मागणी ही त्यांनी केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा चिटणीस राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, हाजी अल्लाउद्दीन सेठ, शहराध्यक्ष सुनील माळी, नगरसेविका माला मेढे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, ज्येष्ठ नेते मनोहर सराफ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !