अट्रावलला चोरट्यांनी म्हशी लांबवल्या


यावल : तालुक्यातील अट्रावल येथून दोन म्हशींची चोरी झाल्याने शेतकर्‍यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावल पोलिसात तक्रार देण्यात आली आहे रवींद्र बळीराम तेली (अट्रावल, ता.यावल) यांनी यावल पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीच्या दोन म्हशी या 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या घराच्या बाहेर बांधल्या होत्या. मध्यरात्रीनंतर कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी म्हशी चोरून नेल्या. हा प्रकार 4 ऑगस्ट रोजी सकाळी निर्दशनास आला. एक लाख 20 हजार रुपये किंमतीच्या म्हशी चोरी गेल्याप्रकरणी यावल पोलिसात तक्रार करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !