राज्य काव्य संमेलनात लखन सजोळे यांचा सहभाग
भुसावळ : वराडसीम येथिल युवा कवी लखन संजय सजोले यांनी संगमनेर येथे आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलनात सहभाग नोंदवला. यावेळी त्यांचा संमेलनात सत्कार करण्यात आला. लखन सजोळे हे विविध सामाजिक विषयावर कविता, लेखन करीत जनजागृती करतात. यातच फुलोरा कलेचे माहेरघर आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन, संगमनेर येथे नेचर अॅग्रो रीसॉर्टमध्ये झाले. या संमेलनात युवा कवी लखन सजोले यांनी ‘माय बाप’ कविता सादर केली.




