भुसावळात आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांचा सत्कार


भुसावळ : भुसावळ शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे आदिवासी दिनानिमित्त नसरवांजी फाईल, सैलानी बाबा दर्गाहजवळ आदिवासी बांधव अमीना बुरान तडवी, अब्दुल दिलदार तडवी, विरकुमार ईदा, विमल ईदा, अनवर दिलदार तडवी या आदिवासी बांधवांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, शहराध्यक्ष रवींद्र निकम, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलीम गवळी, तालुकाध्यक्ष अकील, शहर सचिव हमीद शेख यांनी सत्कार केला. या प्रसंगी शहर उपाध्यक्ष विलास खरात, शहर उपाध्यक्ष संतोष सालवे, राजेश डोंगरदिवे, शहर महिला काँग्रेस उपाध्यक्षा सुजाता सपकाळे, दुर्गाबाई सोनवणे, सपना पगारे, शहर उपाध्यक्ष हमीदा गवली, तन्वीर शेख, जॉनी गवली व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष सलीम गवळी यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !