अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन तरुणीने बाळाला दिला जन्म : नराधमाविरोधात गुन्हा


नागपूर : अल्पवयीन तरुणीवर नराधमाने अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली व पोटात दुखल्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता मुलीने एका बाळाला जन्म दिला. पीडिता केवळ 15 वर्षांची आहे. ती दहावीपर्यंत शिकली असून, तिचे आईवडील मोलमजुरी करतात. मुलीला दोन लहान बहिणी आणि एक भाऊ आहे. मेयो रुग्णालयातून पोलिसांना सोमवारी सायंकाळी माहिती देण्यात आली. पीडीतेच्या जवाबानंतरच आरोपीचे नाव उजेडात येणार आहे. तूर्त पोलिसांनी अज्ञात नराधमाविरोधात पोस्को कायद्यानुसार, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !