दोन हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
श्रीरामपूर : तक्रारदाराच्या नातवाविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच चार्जशीट पाठवण्यासाठी दोन हजारांची लाच मागणार्या श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील हवालदार संजय रघुनाथ काळे यांना श्रीरामपूर पोलीस ठाणे बीट चौकी नंबर तीनच्या कार्यालयात नाशिक एसीबीच्या पथकाने बुधवारी लाच स्वीकारताच अटक केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली. नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे व सहकारी पोलीस निरीक्षक उज्वल पाटील व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.
