लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे आढळली लाखोंची मालमत्ता


मुंबई : शासनाने मंजूर केलेल्या दोन शिक्षण संस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरीता आठ लाखांची लाच मागणार्‍या नाशिक जिल्हा परीषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज वीर यांच्यासह तिघांविरोधात विरोधात एसीबीने गुन्हा नोंदवला होता. दरम्यान, शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले व जि.प.शाळा राजेवाडीचे प्राथमिक शिक्षक पंकज रमे दशपुते यांना अटक करण्यात आली असलीतरी झनकर मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाल्या आहेत. दरम्यान, एसीबीच्या चौकशीत वैशाली वीर (झनकर) यांच्याकडे फ्लॅट, जमीन, कार, रोख रक्कम अशी लाखोंची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.

झनकर यांच्याकडे अशी आहे मालमत्ता
वैशाली झनकर यांच्या नावावर मुरबाड, कल्याण रोड, नाशिक शिवाजीनगर, कल्याण गंधारे आणि नाशिक गंगापूर रोड येथे मिळून चार प्लॅट असल्याचे समोर आले आहे. तसेच वैशाली झनकर यांच्या नावावर सिन्नरमध्ये 0.57 गुंठे, 0.56 गुंठे, 1.51 गुंठे, 3.41 गुंठे जमीन आहे. तसेच कल्याणमधील मिलिंदनगर येथे 31.70 गुंठे, 10.08 गुंठे, 40.80 गुंठे आणि 13.10 गुंठे जमीन आहे. त्याबरोबरच सिन्नरमध्ये अजून 0.22.70 गुंठे एवढी मालमत्ता आहे. त्याशिवाय वैशाली धनकर यांच्याकडे 40 हजार रुपये रोख रक्कम, होंडा सिटी कार आणि एक दुचाकी त्यांच्या नावावर असल्याचे त्यांच्या घराच्या झाडाझडतीमधून समोर आले. तसेच त्यांच्याकडे विविध बँकांची पासबुकेही आढळून आली आहेत.त्याशिवाय या प्रकरणातील अन्य आरोपी असलेल्या वाहन चालक ज्ञानेश्वर येवले याच्या घरी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये त्याच्याबरोबरच त्याच्या पत्नी आणि मुलांच्या नावावर वेगवेगळ्या बँकांच्या पासबूकसह दोन गाड्यांचे आरसीबूक सापडले आहे तसेच दशपुते या शिक्षकाच्या नावावर नाशिकमध्ये टू बीएचके फ्लॅट दुचाकी आणि तीन बँक खाती असल्याची माहिती आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !