आठ लाखांच्या लाच प्रकरणी पसार माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर यांना अखेर अटक


नाशिक : नाशिकच्या लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर झनकर यांना अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. झनकर यांनी शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरीता त्यांच्या शासकीय वाहन चालकामार्फत एका शिक्षण संस्थाचालकाकडून आठ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते मात्र त्या एसीबीच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, वैशाली झनकर यांनी गुरुवारी नाशिकच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्या अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच ठाणे एसीबीने कारवाई करत वैशाली झनकर यांना बेड्या ठोकल्या.

आठ लाखांची लाच स्वीकारताना दोघांना झाली होती अटक
सोमवारी नाशिकच्या जिल्हा परिषदेसमोर शिक्षण संस्थाचालकांकडून झनकर यांच्या शासकीय वाहन चालकाने आठ लाख रुपयांची स्वीकारली होती. त्याला एसीबीने ताब्यात घेतले होते. मात्र रात्री सात वाजेनंतर महिला आरोपीला अटक करता येत नाही. या कायद्यातील नियमाचा फायदा घेऊन झनकर यांनी मंगळवारी सकाळी हजर राहणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लेखी लिहून दिले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी सकाळी पसार झाल्या होत्या. या प्रकरणात शासकीय वाहन चालक आणि एका शिक्षकाला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !