संतापजनक : अपत्य प्राप्तीसाठी चक्क सुनेला नातेवाईक तरुणाशी संबंध ठेवण्यास भाग पाडले


बीड : सुनेने वंशाचा दिवा म्हणून मुलाला जन्म देण्यासाठी सासू-सासर्‍यांनी चक्क नातेवाईक असलेल्या तरुणाशी संबंध ठेवायला भाग पाडल्याची घटना बीडमध्ये घडली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतू पीडीता पाच महिन्यांची गरोदर असून पतीने तिला आता वागवण्यास नकार दिला आहे. नात्याला काळिमा फासणार्‍या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

पती पिता होण्यासाठी सक्षम नाही
पीडीतेच्या तक्रारीनुसार, तिचे 15 वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यातील कडा परिसरात राहणार्‍या मोठोबा भिसे यांच्याशी विवाह झाला. नंदीबैलाच्या माध्यमातून भीक्षा मागून कुटुंबाची उपजीविका भागवतात. 2016 मध्ये माझ्या पतीसह सासू-सासर्‍यांनी पीडीतेला न सांगता अहमदनगर येथील एका हॉस्पीटलमधून टेस्ट ट्यूब बेबी करून घेतली आणि मला मुलगी झाली. मात्र त्यानंतर 2020 मध्ये माझ्या सासूने मला सांगितले की, ‘तुझा नवरा बाप होऊ शकत नाही. मला यावर विश्वास बसला नाही, त्यामुळे मी माझ्या पतीला विचारून याची शहानिशा केली आणि त्यांनी देखील मला तेच सांगितलं.

पती बाहेरगावी जाताच पर पुरूषाशी ठेवायला लावले संबंध
एक महिन्यानंतर माझे पती कामानिमित्त बाहेरगावी गेले असता सासू म्हणाली की, तुझा नवरा कधीच बाप बनू शकत नाही, त्यामुळे आपला वंश चालविण्यासाठी तुला मुलगा होणे गरजेचे आहे. माझ्या भावाचा मुलगा देव यादव सोबत, तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे. त्या गोष्टीला मी नकार दिला असता माझ्या सासू-सासर्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर 3 जानेवारी 2021 रोजी माझ्या सासू-सासर्‍यांनी देव यादव असणार्‍या घरामध्ये मला बळजबरीने पाठवलं आणि दाराबाहेर थांबले. त्यानंतर अनेक वेळा माझी इच्छा नसताना, माझ्या सासू-सासर्‍यांचा दबावाखाली त्याने अनेक वेळा घरी येऊन माझ्यासोबत अत्याचार केले. सर्व सर्व प्रकार करण्यासाठी सासू देव यादवला खर्च-पाण्यासाठी पैसेही देत होते व काही दिवसांनी मी गरोदर राहिल्याचे कळताच सासू-सासर्‍यांनी पेढेदेखील वाटप केले मात्र माझ्या नवर्‍याला हे सर्व कळलं आणि त्यांनी माझ्या भावाला बोलवून मला माहेरी पाठवले असून आता पती नांदवण्यास नकार देत आहे. या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला असून पीडिता ही पाच महिन्यांची गरोदर आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासू – सासर्‍यांनी हे कृत्य करण्यास भाग पाडलं. ती गरोदर राहिल्यावर पेढे वाटले, अनेकांना दारू पाजली. मात्र, आज पोटात असणार्‍या बाळाला, बापाचं नाव काय द्यावं, असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !