एचआयव्ही संसर्गित परीवाराला मदतीचा हात उपक्रम पथदर्शी : आमदार संजय सावकारे


वरणगाव : कोरोनामुळे सर्वसामान्य नागरीकांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यातच जे कुटुंब एचआयव्ही संसर्गित आहे त्यांच्या परीवाराला तर जगणे अवघड झाले आहे. ही बाब लक्षात घेत ॐ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे अश्या परीवाराला एक महिन्याचा किराणा सामान भेट देणारा हा पथदर्शी उपक्रम आहे, असे गौरवास्पद असल्याचे आमदार संजय सावकारे येथे म्हणाले. शनिवारी वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाच्या प्रांगणात डॉ. नितु पाटील यांच्या पुढाकाराने ॐ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान , भुसावळ सोबत आर्थिक दात्यांच्या मदतीने तालुक्यातील एचआयव्ही संसर्गित 51 परीवाराला प्रामुख्याने संक्रमित लहान मुले आणि विधवा महिलांना मदतीचा हात म्हणुन किमान महिनाभर पुरेल एव्हढा किराणा भेट देण्यात आला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी गिरीजा हॉस्पिटलचे डॉ.निलेश चौधरी, विघ्नहर्ता पब्लिकेशनचे रवी निमाणी, सुरतचे सुनील सरोदे, वरणगावच्या चौधरी लॅबचे नितीन चौधरी, आदित्य सुपर स्टोरचे विनायक फालक, समीर पाटील, विजय भंगाळे, सचिन इंगळे आदी उपस्थित होते.




जनहितार्थ उपक्रमांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच
आमदार सावकारे म्हणाले की, ॐ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान मागील चार वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहितार्थ उपक्रम राबवित आहे. कोरोना काळात केलेले विविध जनहितार्थ उपक्रम आणि सोशल मीडियावर जनजागृतीपर लेख नक्कीच दखल घेण्यासारखे आहे.

सामाजिक भान जोपासणारा उपक्रम
कोरोना महामारीमध्ये समाज बांधवांना एक मदतीचा हात म्हणून हा सामाजिक भान जोपासणारा उपक्रम सर्व आर्थिक दात्यांच्या सहकार्याने पार पडला. आगामी काळात अजूनही असेच उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे ॐ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.नितु पाटील म्हणाले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
दरम्यान, गरजू परीवारांची नावे सुनीता तायडे आणि दत्ता गुरव यांनी पाठवली तर उपक्रम यशस्वीतेसाठी कपिल राणे,अंकुश गवळी,ल,दीपक फेगडे,आमीन शेख, मझर शेख, राहूल कोचुरे, प्रकाश फेगडे, भारती पाटील, ज्योती गुरव, नथु चौधरी, पूनम पाटील, साधना बडगुजर, मीनाक्षी राणे आदींनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !