नाडगाव रेल्वे स्थानकावर अवैध दारू विक्री करणार्यांना पकडले
बोदवड : जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव येथील भरारी पथकाने नाडगाव रेल्वे स्थानक परीसरात अवैधरीत्या देशी-विदेशी मद्य विक्री करणार्यांना तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील सुमारे आठ लाखांचा मद्यसाठा जप्त केला. भरारी पथकाचे उपनिरीक्षक एस.पाटील, अजय गावंडे, नरेंद्र पाटील, एम.पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने अवैधरीत्या दारू विक्री करणार्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.




