भुसावळ शहर पत्रकार संस्था, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे उद्या वृक्षारोपण
भुसावळ : भुसावळ शहर पत्रकार संस्था आणि निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्यातर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी 10 वाजता प्रांताधिकारी कार्यालयाच्या वृक्षारोपण होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, आमदार संजय सावकारे, डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, तहसीलदार दीपक ढिवरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, उपाध्यक्ष गणेश वाघ, आशिष पाटील, सचिव हबीब चव्हाण व निसर्ग, सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे नाना पाटील, रघुनाथ आप्पा सोनवणे, सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.




