माजी आमदार शिरीष चौधरी 3 रोजी शक्तीप्रदर्शनाद्वारे भरणार उमेदवारी अर्ज
रावेर : रावेर विधानसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी (क), शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार व माजी आमदार शिरीष चौधरी हे गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या उपस्थित्ीत भव्य रॅलीदेखील काढली जाणार आहे.
रावेर शहरातून निघणार प्रचंड जनसमुदायाची रॅली
रावेर शहरातील आठवडे बाजार, बर्हाणपूर रोड, रावेर येथून गुरूवार, 3 ऑक्टोबर रोजी माजी आमदार शिरीष चौधरी यांची उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी भव्य रॅली निघेल. माजी आमदार चौधरी यांना पाठिंबा देण्यासाठी रावेर-यावल तालुक्यातील सर्व काँग्रेस व राष्ट्रवादी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बुथ कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, यावल राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, रावेर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी केले आहे.


