रावेरातील अपंग बांधवांचे उपोषण अखेर मागे


रावेर : रावेरच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्या यशस्वी मध्यस्तीने स्वातंत्र्य दिनी सुरू असलेले अपंग बांधवाचे आंदोलन मागे घेण्यात आले. जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत सर्व आठही ग्रामसेवकांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे लेखी आस्वासन उपोषणकर्त्यांना देण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

लेखी आश्‍वासनाने उपोषण मागे
रावेर तालुक्यातील आठ ग्रामसेवकांनी सादर केलेले बनावट प्रमाणपत्र प्रकरण तालुक्यात प्रचंड गाजत आहे. याच प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी स्वातंत्र्यदिनी
तालुक्यातील विविध अपंग बांधवांनी पंचायत समिती कार्यालय समोर उपोषण छेडले होते. रावेर गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत आठही ग्रामसेवकांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !