स्वातंत्र्य दिनानिमित्त भुसावळ शहर व परीसरात विविध कार्यक्रम
ठिकठिकाणी ध्वजारोहणानंतर वृक्षारोपण, अन्नदान तसेच सामाजिक कार्यक्रमांचे सोशल डिस्टन्स राखत आयोजन
भुसावळ : भुसावळ शहर व विभागातील विविध शासकिय कार्यालय, विविध शाळा, संघटना, संस्थांतर्फे भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापनदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन करुन ध्वजवंदन, अन्नदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
रेल्वे डीआरएम कार्यालय
भुसावळ : मध्य रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात नवनियुक्त डीआरएम एस. एस.केडीया यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी रेल्वेच्या विविध कार्यालयांचे अधिकारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.



डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान
भुसावळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शासकिय ध्वजवंदन झाले. प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या काळात उल्लेखनीय काम करणाऱे पालिका कर्मचारी, वैद्यकिय अधिकारी, महसूल कर्मचारी, पोलिस, पत्रकार आदींचा कोरोना योध्दा सन्मान चिन्ह देवून सन्मान करण्यात आला. आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, तहसीलदार दीपक धीवरे, उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, सामाजिक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा, आरोग्य सभापती प्रा. दिनेश राठी, भाजप शहराध्यक्ष परिक्षीत बर्हाटे, प्रा. सुनील नेवे आदींसह शहरातील विविध नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
ऑर्डनन्स फॅक्टरी
भुसावळ : ऑर्डनन्स फॅक्टरीच्या प्रशासनिक इमारती समोर ध्वजारोहन ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डी.एस.सी.जवान, फायर ब्रिगेड आणि सुरक्षा कर्मचारी यांनी पथसंचलन केले.ऑर्डनन्स फॅक्टरी चे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांच्या हस्ते निर्माणी मधील सर्वउत्कृष्ट कामकाज करणार्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच दहावी आणि बारावी ला चांगले गुण प्राप्त करणार्या कर्मचार्यांच्या मुलांना गौरविण्यात आले. महिला कल्याण समिती अध्यक्षा वैजयंती निमजे, अप्पर महाव्यवस्थापक राजीव कुमार व नीलाद्री विश्वास आदींची विशेष उपस्थिती लाभली.
कोरोना योद्ध्यांच्या वाहनांची मोफत वॉशिंग
भुसावळ : गडकरी नगरातील बरडे वाशिंग सेंटरने कोरोना फ्रंटलाईन वर्कर, कोरोना योद्ध्यांच्या वाहनांना मोफत वॉशिंग करून देण्याचा सामाजिक उपक्रम राबवला. यात रुग्णवाहिका, डॉक्टर, परीचारिका, पोलीस, पत्रकार आदींची वाहने मोफत धुव0ून कृतज्ञता व्यक्त केली. भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमाला सुरवात झाली. आनंदराव बरडे , राहुल चंदन , कृष्णा परदेशी , मुकेश सुरवाडे , दीपक बरडे, पिंटू शेजवळ यांनी परीश्रम घेतले. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी सादर उपक्रम राबविल्या बद्दल कौतुक करून बक्षीसही दिले.
दे.ना.भोळे महाविद्यालय
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. पी. फालक यांचे हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक प्रवीण भोळे, प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केले.
आचेगाव ग्रामपंचायत कार्यालय
आचेगाव, ता.भुसावळ : ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मनीषा झांबरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह विद्या सूर्यवंश उपस्थित होत्या. जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत स्कूल चेअरमन कल्पना चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागासवर्गीय सेलचे भुसावळ तालुकाध्यक्ष जयराज पवार, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे, ग्रामपंचायत सदस्या माधुरी फेगडे, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा पाटील, आकाश झांबरे, आशीष चौधरी तसेच गावातील ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.
प.क.कोटेचा महिला महाविद्यालय
भुसावळ : श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ध्वजारोहण संस्था कोषाध्यक्षा राधेश्याम लाहोटी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य शिरीष नाहाटा, डॉ.संदीप जैन, प्रशांत नाहर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ.जनार्धन धनवीज, उपप्राचार्य प्रा.वाय.डी.देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ.सरोज शुक्ला हे उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर कोरोनावर मात करून बरे झालेल्या डॉ.शुभांगी राठी, प्रा.संदीप नेतनराव, प्रा.आर.एच.पाटील, प्रा.मनोज कुरकुरे, डॉ.सरोज शुक्ला, डी.पी.सपकाळे, अनिल काळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कोरोना काळत अहोरात्र सेवा दिलेल्या डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर संदीप जैन यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
एम.आय.तेली इंग्लिश स्कूल
भुसावळ : शहरातील एम.आय.तेली इंग्लिश स्कूलमध्ये माजी नगरसेवक हाजी साबीर शेख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सस्थिाध्यक्ष हाजी मुन्ना इब्राहिम तेली, हाजी आयुब सर, अख्तर पिंजारी, हाजी रहिम उद्दीन शेख, हाजी शब्बीर शेख, सुलेमान भाई तडवी, आशिक भाई तेली, हुसेन उद्दीन शेख, जलील भाई कुरेशी, स्कूलचे मुख्याध्यापक सय्यद वाजीद अली व शिक्षकांची उपस्थिती होती.
बोदवड जिल्हा परीषद उर्दू कन्या शाळा
बोदवड : जिल्हा परीषद उर्दू कन्या शाळेत शाळा समितीचे अध्यक्ष बशीर खान यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बशीर खान होते. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील मैदानावर सर्व कर्मचारी सदस्यांच्या हस्ते झाड लावण्यात आले. मुख्याध्यापक शेख इक्बाल फयाजुद्दीन म्हणाले की, वृक्ष लागवडीचे महत्त्व आणि संदेश आता घरोघरी पोहचवण्यात येईल. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बशीर खान, मुख्याध्यापक शेख इक्बाल फयाजुद्दीन, समन्वयक सादिक अहमद, नियमत शेख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक बोदवडचे मजहर मुख्तार शाह, कोषाध्यक्ष जैनुल अब्दीन, जावेद शाह , आसिफ खान आणि शाळेच्या सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

