सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या परीवाराची काळजी घेणे आपले सर्वांचे कर्तव्य


पालकमंत्री गुलाबराव पाटील : भुसावळात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

भुसावळ : देशासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या सैनिकाला मान-सन्मान दिलाच पाहिजे. सैनिकांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव, कोणी सांगून नव्हे, तर आपल्या मनातून यायला हवी. सीमेवर लढताना मागे आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला लाखो-करोडो बांधव आहेत, अशी सुरक्षिततेची भावना आपण जवानांमध्ये निर्माण करायला हवी आणि ते आपलं सर्वांचं कर्तव्यच आहे. भुसावळात शिवसेना माजी नगरसेवक दीपक धांडे व शारदा धांडे यांच्यातर्फे श्रीनगर भागात आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू’ हे गीत म्हणून पालकमंत्र्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, माजी तालुकाप्रमुख नीळकंठ फालक, माजी नगराध्यक्षा माधुरी फालक, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, निलेश महाजन, नगरसेवक मनोज बियाणी व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक दीपक धांडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.उत्तम सुरवाडे, प्रा.धीरज पाटील यांनी केले.




यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, माजी नगरसेवक अ‍ॅड.नरेंद्र लोखंडे, उपशहर प्रमुख राकेश खरारे, स्वप्नील सावळे, पवन नाले, विभागप्रमुख अमोल पाटील, शाखाप्रमुख पिंटू भोई, चेतन भोई, किरण बढे, अशोक धांडे, प्रसिद्धीप्रमुख गोकुळ बाविस्कर यांनी परीश्रम घेतले. दरम्यान, प्रथम पारितोषिक चक्रधर यावलकर, द्वितीय पारितोषिक विकास जंजाळे, तृतीय पारितोषिक संजय सुरवाडे तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक लिशा केदारे यांना मिळाले. विनोद निगम, डी.एम. हे लोडे, जितेश मराठे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !