गावठी कट्ट्यासह चिंचोलीचा तरुण गुन्हे शाखेच्या जाळ्यात


यावल : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चिंचोलीच्या तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. गणेश शिवाजी पाटील (21, रा.रामानंद नगर, चिंचोली, ता.यावल) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महानज, हवालदार शरद भालेराव, हवालदार महेश महाजन, नाईक किरण चौधरी, नाईक प्रमोद लाडवंजारी, नाईक किरण धनगर, कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक अभिलाषा मनोरे, भारत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !