भुसावळ उपनगराध्यक्षपदी सोनी बारसेंची बिनविरोध निवड
भुसावळ : पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत आगामी दोन महिन्यांसाठी सोनी संतोष बारसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर मंगळवारी दुपारी 12 वाजता विशेष सभा तहसीलदार दीपक धीवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व उपमुख्याधिकारी महेंद्र कथोरे उपस्थित होते.
- भुसावळातील रेल्वेतील लाचखोर मंडळ अभियंत्यांच्या घरात सापडले 15 लाखांचे घबाड
एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड
उपनगराध्यक्ष पदासाठी सोनी संतोष बारसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ऑनलाईन सभेत भाजपाच्या 28 नगरसेवकांनी हजेरी लावली. विशेष सभेत प्रभाग क्रमांक 9 – अ मधून निवडून आलेल्या नगरसेविका सोनी संतोष बारसे यांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.



