ओझरखेडा धरण भरण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचे जलसमाधी आंदोलन
15 दिवसात पाणी टाकण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे
मुक्ताईनगर : ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकावे, संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी व शेतकर्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई संबंधित अधिकार्यांकडून वसूल करावी, या मागणीसाठी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले मात्र मागण्या मान्य न झाल्याने मंगळवारी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रत्यक्षात आंदोलन सुरू करण्यात आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही, असा पवित्रा आमदारांनी घेतल्यानंतर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कडलग यांनी ओझरखेडा धरणावर धाव घेतली. 15 दिवसात पाणी टाकण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, 15 दिवसात पाणी टाकण्यासंदर्भात उपाययोजना व संबंधित अधिकार्यांवर कारवाई न झाल्यास पुन्हा शिवसेनेतर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनात यांचा सहभाग
या आंदोलनात जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, बोदवड तालुका प्रमुख गजानन खोडके, मुक्ताईनगर तालुकाप्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, नवनीत पाटील, जीवराम कोळी, शिवाजी पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, बोदवड शहरप्रमुख हर्षल बडगुजर, शहर संघटक वसंत भलभले, माजी सभापती आनंदराव देशमुख, माजी सभापती चंद्रकांत कारले, माजी सरपंच समाधान कारले, सरपंच दीपक कोळी, पांढरी मुलांडे, अशोक चौधरी, के.एन.पाटील, रामदास मुलांडे, निवृत्ती भड, उपसरपंच नामदेव भड, सीताराम चवरे, राजू खराटे, आत्माराम दांडगे, बाळू पाटील, दिलीप दांडगे, कैलास सपकाळ, सोपान तायडे, सचिन भड, नितीन महाजन, किसन चव्हाण, मधूकर काळे, ईश्वर कापसे आदी शेतकरी बांधवांसह नगरसेवक संतोष मराठे , मुकेश वानखेडे, संतोष (बबलू) कोळी, आरीफ आझाद, नूरमोहम्मद खान, शकुर जमदार, सलीम खान, जाफर अली, बोदवड नगराध्यक्षा पती सईद बागवान, नगरसेवक देवा खेवलकर, आनंद पाटील, सुनील बोरसे, संजय गायकवाड, सागर पाटील, दीपक माळी, नाना बोदडे, लालसिंग पाटील, सचिन पाटील, अमोल व्यवहारे, नरेंद्र गावंडे, किशोर पाटील, सोपान तायडे, वनील कोळी, स्वप्नील श्रीखंडे आदींसह हजारो शेतकरी व शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक बांधव उपस्थित होते.



