भुसावळ रेल्वेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या एमओएच शेडमधील कर्मचार्याचा सत्कार
भुसावळ : रेल्वेच्या एमओएच (टीआरएस) शेडमधील कर्मचारी रणजीतसिंग लिलाधर चौधरी वेल्डर यांनी रेल्वेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना रेल्वेतर्फे शेडचे सिनीयर डी.हिमांशू रामदेव यांनी सन्मानीत केले. रणजीत चौधरी यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याने त्यांच्यासह 55 रेल्वे कर्मचार्यांना शेड मध्येच सन्मानीत करण्यात आले. यावेळी सौरभ गोयल, अंकीत बंसल, एच.आर.विभाग प्रमुख राजेश भारंबे सह अधिकारी उपस्थित होते.




