चारीत्र्याच्या संशयातून पत्नीचा खून : आरोपी पतीला अटक
पिंपरी : पत्नीचा चारीत्र्याच्या संशयातून पतीनेच कोयत्याने हल्ला करीत खून केल्याची घटना पिंपरीत पुनावळे येथे मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. या घटनेत गौरी राहुल प्रतापे (21, रा. विजयनगर, माळवाडी, पुनावळे) या विवाहितेचा मृत्यू झाला तर या प्रकरणी आरोपी पती राहुल गोकुळ प्रतापे (30, रा. विजयनगर, माळवाडी, पुनावळे), याला अटक करण्यात आली. रीक्षा चालक नवनाथ रामदास बोरगे (32, रा. विजयनगर, पुनावळे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली. आरोपी राहुल प्रतापे हा सिक्युरिटी गार्ड असून पत्नीच्या चारीत्र्यावर तो नेहमीच संशय घेत होता व त्यातच याच कारणावरून मंगळवारी त्यांच्यात भांडण झाले. रात्री लोखंडी कोयत्याने आरोपीने पत्नी गौरीवर वार केल्याने तिचा मृत्यू झाला.
