भुसावळात बनावट तृतीय पंथीयांना चोपले


भुसावळ : तृतीयपंथीयाचा वेश धारण करून नागरीकांकडून पैसे जमा करणार्‍या बनावट तृतीयपंथीयांना खर्‍या तृतीयपंथीयांनी चोपल्याचा घटना मामाजी टॉकीज परीसरात बुधवारी सकाळी 10 वाजता घडली. बनावट तृतीयपंथीयाची वरात काढत पोलीस ठाण्यात नेण्यात आले मात्र आपसात समेट झाल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे माहिती सूत्रांनी दिली. बनावट तृतीयपंथीयांच्या भर चौकात कपडे काढण्यात आले असता सर्व पुरूष निघाले तर यावेळी मोठी गर्दी जमा झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !