भुसावळच्या महिलेची दिड लाखांची पोत बसमधून लंपास


भुसावळ : जळगावहून नाशिक जाण्यासाठी निघालेल्या भुसावळच्या महिलेचे दागिने अज्ञात महिने बसमधील प्रवासात लंपास केल्याची घटना जळगाव-पारोळा दरम्यान घडली. धुळे येथे आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने धुळे शहर पोलिसात तक्रार दिली व ती जळगाव पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आली. मोनाली रवींद्र खरे (34, अयोध्यानगर, भुसावळ) या जळगावहून नाशिककडे निघाल्या असताना प्रवासात त्यांच्याजवळ अनोळखी महिला येवून बसली. तिने खरे यांची पर्स लांबवली. त्यात 23 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व पदक व कानातल्या बाळ्या असा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !