पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाच प्रकरण : अटकेतील आरोपींची संख्या झाली पाच : स्वीय सहाय्यकांच्या कॅबीनमधून लाखोंची रक्कम जप्त


पुणे : पिंप्री-चिंचवड महापालिकेतील लाच प्रकरणी आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील स्वीय सहाय्यकांच्या दालनात सुमारे आठ लाखांपेक्षा अधिक रोकड सापडल्याची माहिती आहे. दरम्यान, अटकेतील आरोपींमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लिपिक व स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरीया, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भिमराव कांबळे या आरोपींचा समावेश आहे.

आठ लाखांहून अधिक रक्कम जप्त
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी पालिकेत सापळा यशस्वी केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकाच्या कॅबीनमध्ये 8 लाखांहून अधिक बेकायदा रक्कम आढळल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने अध्यक्ष आणि स्वीय्य सहायक यांच्या घरावर छापे घातले मात्र त्यात काय आढळले हे कळू शकले नाही. तपास पोलीस उपअधीक्षक सीमा मेहंदळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !