मानव्य विद्या शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या बहुसंख्य संधी उपलब्ध- डॉ.जयेंद्र लेकुरवाळे


भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यान

भुसावळ : मानव्यविद्या शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षांबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मानव्यविद्याशाखेतील विद्यार्थी चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात. स्वयंरोजगाराच्या संधी सुद्धा सामाजिक शास्त्र व भाषा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. भाषेच्या विद्यार्थ्यांनी पटकथा, संवाद लेखन तसेच स्पर्धा परीक्षेतून करिअर करावे. त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्रातील इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, संगीत, शिक्षणशास्त्र या विषयांमध्ये सुद्धा विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात, अशी माहिती जळगावच्या डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी येथे दिली. भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील वाद-विवाद मंडळ, वाड़मय मंडळ आणि नाट्यशास्त्र मंडळ आयोजित’ मानव्यविद्या शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील, डॉ.ए.डी. गोस्वामी, डॉ.बी.एच.बर्‍हाटे, डॉ.एन.ई.भंगाळे व वादविवाद मंडळ चेअरमन डॉ.जे.एफ.पाटील, वाड़मय मंडळ चेअरमन प्रा.दीपक पाटील, नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.वैभव मावळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे होत्या. प्रास्ताविक वाद-विवाद मंडळ चेअरमन डॉ.जे.एफ. पाटील यांनी केले.




नवीन संधी शोधून रोजगाराची वाट धरावी : प्राचार्य
प्राचार्य डॉ.वायकोळे म्हणाल्या की, मानव्यविद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी करिअरच्या नवीन संधी शोधून आपली रोजगाराची वाट धरावी. मानव्यविद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी चौकस राहून आपल्या विषयाचे ज्ञान प्राप्त करून आपल्या विषयातील नवीन संधी शोधाव्या. प्रमुख पाहुण्यांचा परीचय वाड़मय मंडळाचे चेअरमन प्रा.दीपक पाटील यांनी तर आभार प्रा.पुरुषोत्तम महाजन यांनी मानले. व्याख्यान यशस्वीतेसाठी प्रा.हर्षल पाटील, डॉ.स्मिता चौधरी, डॉ.आर.एस.नाडेकर, प्रा.पूनम महाजन, प्रा.संगीता भिरूड, डॉ.मनोज पाटील आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !