भुसावळात जागतीक छायाचित्रण दिन उत्साहात
भुसावळ : शहरातील रींग रोडवरील सुखदेव पाटील नगरात गुरुवार, 19 रोजी वरीष्ट छायाचित्रकारांमार्फत जागतीक छायाचित्रण दिन उत्साहात साजरा करण्यात आाल. प्रसंगी जुन्या व नव्या कॅमेर्यांचे राजेंद्र जावळे व श्याम गोविंदा यांनी पूजन केले. यावेळी वरीष्ठ छायाचित्रकार राजेंद्र जावळे, आविनाश साळी, शंभू मेहेंदळे, श्याम गोविंदा, ईम्तीयाज अहमद, गणेश राठोड, भरत शिंपी, अरुण पाटील, रमाकांत भालेराव, सतीश कांबळे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी शंभू मेहेंदळे, राजेंद्र जावळे, श्याम गोविंदा, रमाकांत भालेराव, राजेंद्र जावळे, सतीश कांबळे यांनी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अविनाश साळी यांनी तर आभार गणेश राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भरत शिंपी व अन्य छायाचित्रकारांनी परीश्रम घेतले.




