रेल्वे सुरक्षा बलााने 43 लाखांची रोकड पकडली


हवाल्याची रक्कम असल्याचा संशय : विदर्भ एक्स्प्रेसमध्ये रक्कम देताना यंत्रणेची कारवाई

अकोला : विदर्भ एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाकडे सुमारे 43 लाख रुपयांची रक्कम देण्याच्या बेतात असलेल्या एका युवकास अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने पकडत त्याच्याकडील 43 लाख 300 रुपयांची रोकड जप्त केली. अकोला आरपीएफने गुरुवारी सकाळी 9 वाजता ही कारवाई केली असून ही रक्कम हवाल्याची असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मनोज हरीराम शर्मा (22, शासकीय दूध डेअरी परीसर) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

इशार्‍यावरून होणार होती कॅश ट्रान्सपर
रोकड असलेली बॅग घेऊन शर्मा हा रेल्वेस्थानकावर आला व ही बॅग तो विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मुंबईकडे प्रवास करणार्‍या एका प्रवाशाकडे देणार होता. ही बॅग ज्या प्रवाशाकडे देणार होता त्या प्रवाशाचे नाव किंवा इतर माहिती शर्मा याच्याकडे नव्हती, मात्र दि पप्पी शॉप स्टेशन रोडच्या मालकाने बोगी बी. 4 च्या दारात उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हातात ही बॅग देण्याचा इशारा शर्मा यास करण्यात आला होता; मात्र याची माहिती अकोला आरपीएफला मिळताच त्यांनी रेल्वेस्थानकावर सापळा रचला. मनोज शर्मा हा रोकड असलेली बॅग रेल्वेतील प्रवाशाच्या हातात देत असताना अकोला आरपीएफने छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. रेल्वेतील प्रवासी हा आतमध्ये निघून गेला मात्र अकोला आरपीएफच्या ताब्यात मनोज शर्मा लागला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !